चिमूर (चंद्रपूर) -तालुक्यातील तडोधी (नाईक) येथील दहिकर विद्यालयाच्या आवारातील चिंचेच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मृत हा टेकेपार येथील रहिवासी असून त्याचे नाव सौरभ मोतीराम कुळमेथे (वय 21 वर्षे, रा. टेकेपार) असे त्या तरुणाचे नाव आहे.
चिमूरमध्ये भाऊबिजेदिवशीच तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या - chimur crime news
चिमूर तालुक्यातील तडोधी (नाईक) येथील दहिकर विद्यालयाच्या परिसरात 21 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
चिमूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या टेकेपार येथील माजी पंचायत समिती सदस्य मोतीराम कुळमेथे यांचा सौरभ हा लहान मूलगा आहे. भाऊबिजेसाठी बहिण व भाऊजी आले होते. घरात आंनदी वातावरण होते. बाहेर जाऊन येतो असे सांगून सौरभ घराबाहेर पडला. जवळच असलेल्या तडोधी (नाईक) येथील दहिकर विद्यालयाच्या परिसरात असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत गावकऱ्यांना आढळला.
घटनेची माहिती कुंटूब व पोलीस विभागाला देण्यात आली. पोलिसांना घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले. आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झाले नाही.