चिमुर -कोरोणा विषाणुच्या प्रादुर्भाव काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सदैव तत्परतेने पोलीस कोरोणा योद्धांनी कर्तव्य बजावले. सध्याच्या स्थितीत सर्वत्र रक्तांचा तुटवडा निर्माण झाला आहे. याही परिस्थितीवर मात करण्यासाठी चिमूर पोलीस ठाणे येथे रक्तदान शिबिरात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वंयस्फुर्त रक्तदान करूण समाजाशी रक्ताचे नाते जपले.
चिमुर पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन
चिमुर येथील पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वंयस्फुर्तीने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
कोरोणा विषाणुच्या प्रादुर्भावाने सर्वत्र रक्तांची मागणी वाढली. यामूळे रक्तपेढीमध्ये रक्तांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामूळे शासकीय, राजकीय व सामाजीक पातळीवर रक्तदान शिबिरांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जात आहे. या परीस्थितीमध्ये आपले सामाजीक व राष्ट्रिय कर्तव्य म्हणुन चिमूर पोलीस उप विभागात चिमूर, भीसी व शेगाव पोलीस ठाण्यामध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
चिमूर पोलीस ठाण्यामध्ये जिवन ज्योती रक्तपेढी नागपूर यांचे सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदान शिबिरात उप विभागीय पोलीस अधिकारी नितिन बगाटे (भापोसे), पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे, सहाय्यक पोलीस निरिक्षक मंगेश मोहोड, उप पोलीस निरीक्षक राजु गायकवाड, अलिम शेख या पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांनी स्वंयस्फुर्तीने रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात चिमूर, नेरी व परिसरातील युवकांनीही रक्तदान केले. एकूण ११५ रक्तदात्यांनी शिबिरात रक्तदान केले. रक्तदान शिबिर यशस्वि करण्यासाठी डॉ.शिला मुंधळा यांचे नेतृत्वात जिवन ज्योती रक्तपेढी नागपूरचे सर्व तंत्रज्ञ व कर्मचारी तसेच चिमूर पोलिस ठाण्याच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. चिमूर पोलीस ठाण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच रक्तदान शिबिर घेऊन स्तुत्य उपक्रम राबविल्या बद्दल सर्व स्तरातून पोलींसाचे कौतुक केले जात आहे.