अतिवृष्टीचा फटका... 'ब्लॅक राईस'च्या प्रयोगावर निसर्गाने फेरले पाणी - Heavy rain fall in chandrapur
गोंडपिंपरी तालुक्यात पहिल्यांदाच काळ्या तांदळाच्या लागवडीचा प्रयोग एका तरुण शेतकऱ्याने केला होता. मात्र, जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे काळ्या तांदळाच्या या प्रयोगावर निसर्गाने मात्र पाणी फेरले आहे.
'ब्लॅक राईस'च्या प्रयोगावर निसर्गाने फेरले पाणी
राजुरा (चंद्रपूर)-आयुर्वेदिक तांदूळ अशी ओळख असलेल्या काळ्या तांदळाचा प्रयोग गोंडपिपरी येथील शेतकऱ्याने केला होता. धान पीक चांगले जोपासले होते. मात्र शेतकऱ्याचा या प्रयोगावर निसर्गाने पाणी फेरले आहे. मंगळवार, बुधवार झालेल्या अतिवृष्टीने काळ्या धानाचे पीक जमिनीवर पडले आहे. त्यामुळे मोठ्या उत्साहाने काळ्या तांदळाची शेती करणाऱ्या गोंडपिपरी तालुक्यातील केलीचंद झाडे या तरुण शेतकऱ्याचा हा प्रयोग निसर्गाचा लहरीपणाने अयशस्वी ठरला आहे.