चंद्रपूर- जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदाच्या आज (दि. 2 जाने.) झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. चंद्रपूर, बल्लारपूर, मूल, सिंदेवाही, ब्रम्हपुरी, गोंडपिपरी, भद्रावती या पंचायत समित्यांवर भाजपने आपला विजय सुनिश्चित केला आहे.
चंद्रपूर पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या केमा रायपुरे तर उपसभापतीपदी निरीक्षण तांड्रा निवडून आले आहेत. बल्लारपूर पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या इंदिरा पिंपरे तर उपसभापतीपदी सोमेश्वर पदमगिरीवार निवडून आले आहेत. मूल पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे चंदू मारगोनवार तर उपसभापतीपदी घनश्याम जुमनाके हे निवडून आले आहेत. गोंडपिपरी पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या सुनिता येग्गेवार तर उपसभापतीपदी अरूण कोडापे हे निवडून आले आहेत. सिंदेवाही पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या मंदा बाळबुधे तर उपसभापतीपदी शिला कन्नाके यांची निवड झाली आहे. ब्रम्हपुरी पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे रामलाल दोनाडकर यांची निवड झाली आहे. भद्रावती पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या नाजूका मंगाम तर उपसभापतीपदी प्रविण ठेंगणे विजयी झाले आहेत. जिवती पंचायत समितीच्या उपसभापती भाजपचे महेश देवकते व सावली पंचायत समितीच्या उपसभापतीपदी रवींद्र बोलीवार विजयी झाले आहेत. पोंभुर्णा पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक उद्या (दि. 3 जाने) होणार आहे.