चंद्रपूर - 2014 मध्ये सर्व पक्ष वेगवेगळे लढले होते. त्यावेळी निवडणुकीनंतर आम्हाला राष्ट्रवादी काँगेस पक्षाला घेऊन सरकार तयार करण्याचा पर्याय होता. तशा आमच्यात चर्चाही झाल्या होत्या. मात्र अंतिम क्षणी आम्ही विचाराच्या नावाने शिवसेनेची निवड केली आणि त्यांच्यासोबत सरकार स्थापन करत 12 मंत्रीपदे दिलीत. मात्र ती आमची सर्वात मोठी चूक होती. त्याचे प्रायश्चित्त आम्ही आजवर भोगतोय, असे मोठे विधान माजी अर्थमंत्री तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
Sudhir Mungantiwar Statement : 'राष्ट्रवादी ऐवजी शिवसेनेबरोबर जाणे आमची चूक होती, त्याचे प्रायश्चित्त आजही भोगतोय'
देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रवीण दरेकर, आशिष शेलार, किरीट सोमय्या हे सेनेला दररोज धारेवर धरत आहेत. अशातच 2014 विधानसभेच्या वेळी काय झाले होते याचा खुलासा भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
हेही वाचा -Raj Thackeray Aurangabad Sabha : अखेर राज ठाकरेंची तोफ धडाडणार; औरंगाबादच्या सभेसाठी परवानगी
राष्ट्रवादीसोबतचा पर्याय खुला होता - देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रवीण दरेकर, आशिष शेलार, किरीट सोमय्या हे सेनेला दररोज धारेवर धरत आहेत. अशातच 2014 विधानसभेच्या वेळी काय झाले होते याचा खुलासा भाजपाचे ज्येष्ठ नेते मुनगंटीवार यांनी केला आहे. 2014 मध्ये आम्हाला राष्ट्रवादीसोबत जाण्याचा पर्याय खुला होता. सरकार बनविण्याच्या दृष्टीने दोन्ही पक्षात चर्चा देखील झाली होती. मात्र आम्ही सेना हा आमचा पारंपरिक मित्र पक्ष असल्याने त्यांच्यासोबत सरकार स्थापन केले. मात्र ही आमची मोठी चूक होती. या चुकीचं प्रायश्चित्त आम्ही आजवर करीत अहोस असे विधान मुनगंटीवार यांनी केले आहे. हा व्हिडीओ मुनगंटीवार यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर टाकला आहे. त्यामुळे हे केवळ उत्स्फूर्त विधान नसून भाजपाचे अधिकृत विधान असल्याचे बोलल्या जात आहे. या विधानामागच्या राजकीय अर्थाचे अनेक कयास राजकिय विश्लेषकांकडून लावले जात आहेत.