चंद्रपूर - जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले. संध्या गुरनुले अध्यक्ष आणि रेखा कारेकर यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. गुरनुले यांनी काँग्रेसच्या वैशाली शेरके यांचा आणि रेखा कारेकर यांनी खेमराज मरसकोल्हे यांचा ३६ विरुध्द २० मतांनी पराभव केला. सुधीर मुनगंटीवार यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
56 सदस्यांच्या सभागृहात भाजपकडे स्पष्ट बहुमत (36) आहे. त्यामुळे अध्यक्ष भाजपचाच होईल, हे जवळपास निश्चित होते. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही निवडणूक एकतर्फी होण्यासाठी काळजी घेतली होती. त्यामुळे काँग्रेसच्या फोडाफोडीच्या प्रयत्नांना यश आले नाही. संध्या गुरनुले या दुसऱ्यांदा अध्यक्ष पदावर विराजमान झाल्या आहेत.