चंद्रपूर - आंबेडकरी चळवळीतील सक्रिय नेते तसेच भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष राजू देवगडे यांचे शनिवारी कोरोनाने निधन झाले. त्यांना नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याच दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष राजू देवगडे यांचे कोरोनाने निधन - भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष राजू देवगडे
आंबेडकरी चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते राजू देवगडे त्यांच्यावर सात दिवसांपासून नागपूर येथे उपचार सुरू होते. मात्र, मधुमेहाचा त्रास असल्याने त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. अखेर काल रात्री त्यांचे कोरोनाने निधन झाले.
राजू देवगडे हे आंबेडकरी चळवळीचे सक्रिय कार्यकर्ता होते. त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात भारिप बहुजन महासंघापासून केली. यानंतर त्यांनी आंबेडकरी चळवळीतील अनेक पक्षात काम केले. सध्या ते भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष होते. दहा दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. डॉ. विश्वास झाडे यांच्या रुग्णालयात त्यांच्यावर सात दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, मधुमेहाचा त्रास असल्याने त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. अखेर शनिवारी त्यांना नागपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आणि काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नागपूर येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा -'शेतकरी विरोधी "काळे कायदे" मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करत राहणार'