महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भांगडीयाचे मिक्सरवाटप भ्रष्टाचाराच्या पैशातून; काँग्रेसच्या सतीश वारजुरकरांची चौकशीची मागणी

काल १६ ऑगस्टला चिमूर येथे क्रांती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. येथे १९४२ साली मोठा उठाव झाला होता. तेव्हापासून या ठिकाणी क्रांती दिनाचे आयोजन केले जाते. काल या कार्यक्रमाला अमृता फडणवीस सुद्धा येणार होत्या. त्यापूर्वी येथील आमदार बंटी भांगडीया यांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून महिलांना मिक्सर वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. मात्र मुलभूत सुविधे अभावी १८ महिलांना भोवळ आली.

काँग्रेसचे सतीश वारजुरकरांची चौकशीची मागणी

By

Published : Aug 18, 2019, 12:25 AM IST

चंद्रपूर- आमदार बंटी भांगडीया यांनी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात गोरगरीब महिलांची क्रूर थट्टा केली. मिक्सर वाटपाच्या निमित्ताने त्यांनी आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम केले. मिक्सर घेण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, याबाबत कुठलेही नियोजन नसल्याने अनेक महिला चक्कर येऊन पडल्या. या प्रकारनंतर भांगडीया यांनी हे नियोजन भ्रष्टाचाराच्या पैशातून केले असून त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते सतीश वारजुरकर यांनी केली.

काँग्रेस नेते सतीश वारजुरकर

काल १६ ऑगस्टला चिमूर येथे क्रांती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. येथे १९४२ साली मोठा उठाव झाला होता. तेव्हापासून या ठिकाणी क्रांती दिनाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाला अमृता फडणवीस सुद्धा येणार होत्या. त्यापूर्वी येथील आमदार बंटी भांगडीया यांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून महिलांना मिक्सर वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. यासाठी संपूर्ण मतदारसंघातून सकाळपासून मोठ्या प्रमाणात महिला आल्या होत्या. मात्र, त्यांच्याकरीता कुठलीही विशेष सोय उपलब्ध नव्हती.

हा कार्यक्रम दुपारी सुरू झाला. यावेळी मूलभूत सुविधा नसल्याने १८ महिला चक्कर येऊन पडल्या. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होते. यावर काँग्रेसचे नेते सतीश वारजुरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. या कार्यक्रमात एकाही महिलेला मिक्सर मिळाला नाही. त्यांना पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय नव्हती. शेडची व्यवस्था नव्हती. यामुळे महिला चक्कर येऊन पडल्या असेही ते म्हणाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चमकोगिरी करण्यात आली, असा आरोप वारजुरकर यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details