चंद्रपूर - मूल शहरातील कर्मवीर महाविद्यालयाच्या स्वच्छतागृहात चक्क एक अस्वल लपून बसले होते. या अस्वलाने केलेल्या हल्यात एक विद्यार्थिनी जखमी झाली. या विद्यार्थीनीला चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यत आले आहे.
कर्मवीर महाविद्यालयाच्या स्वच्छतागृहात चक्क अस्वल; हल्ल्यात विद्यार्थीनी जखमी - नागरिक
आज सकाळी साडेआठ वाजता नीता नारायण सोनुले स्वच्छतागृहात गेली असता अस्वलाने तिच्यावर अचानक हल्ला केला.
उन्हाळ्यात या महाविद्यालय परिसरात नेहमीच अस्वलांचा वावर असतो. मात्र, पावसाळ्यात ही एका अस्वलाने महाविद्यालयाच्या स्वच्छतागृहात ठाण मांडले. आज सकाळी साडे आठ वाजता मूळची केळझर येथील नीता नारायण सोनुले स्वच्छतागृहात गेली असता अस्वलाने तिच्यावर अचानक हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली असून मूल येथे उपचाराकरता तिला दाखल करण्यात आले. मात्र, प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मूल शहरातील कर्मवीर महाविद्यालयात उन्हाळ्याच्या वेळेस नेहमीच अस्वलांचा वावर असतो. याही उन्हाळ्यात या महाविद्यालय परिसरात एक मादी अस्वल तिच्या तीन पिलांसह आली होती. अनेक नागरिकांनी हे दृश्य बघितले होते अखेर त्यांना हुसकावून लावल्यानंतर सर्वांनी मोकळा श्वास घेतला. मात्र, पावसाळ्यातही या महाविद्यालयात अस्वलांचा वावर सुरूच आहे.