महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 7, 2019, 10:01 PM IST

ETV Bharat / state

'बाळू धानोरकरांच्या 'त्या' आक्षेपार्ह विधानाबद्दल कायदेशीर कारवाई करणार'

बुधवारी जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना खासदार बाळू धानोरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांचा प्रयोग करत टीका केली होती. तसेच माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याविषयी देखील याच पद्धतीत टीका केली होती.

हंसराज अहिर, केंद्रीय गृहराज्यमंत्री

चंद्रपूर- पराभव झाला म्हणून लाजायचे नाही आणि विजयी झालो म्हणून माजायचे नाही, या तत्वावर आम्ही चालतो. मात्र, तुम्ही जिंकून येऊन घरी बसता, चुली फुकता, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवरुन केलेली टीका यातून तुमचे संस्कार दिसतात. जनता सर्व बघत आहे. आम्ही यावर कायदेशीर कारवाई करणार या शब्दात काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी प्रतिक्रिया दिली.

हंसराज अहिर, केंद्रीय गृहराज्यमंत्री

हेही वाचा - वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे अखेर 'त्या' वाघाचा मृत्यू; वन्यजीव प्रेमींमधून संताप

बुधवारी जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना खासदार बाळू धानोरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांचा प्रयोग करत टीका केली होती. तसेच माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याविषयी देखील याच पद्धतीत टीका केली होती.

हेही वाचा - खासदार धानोरकरांची जीभ घसरली, पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलं 'हे' आक्षेपार्ह विधान

यावर अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोध हा समजू शकतो. मात्र, अशा प्रकारच्या आक्षेपार्ह भाषेचा वापर कधीही खपवून घेतला जाणार नाही. फक्त धानोरकरच नाही तर तिथे उपस्थित काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याविरोधात देखील आम्ही कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहोत, असे अहिर यांनी सांगितले. त्यामुळे धानोरकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details