महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तुकडोजी महाराजांच्या शैलीत कोरोनावर भजन, छोटूलालने केली जनजागृती

वेगवेगळ्या कार्यक्रमात अनेकांच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करून रसिकांच्या टाळ्या घेणाऱ्या छोटूलालने आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या शैलीत भजन गायले. भजनाव्दारे छोटूलालने कोरोनाबाबत जनजागृती केली. विशेष म्हणजे भजन गाताना त्याने तुकडोजी महाराजांसारखी वेशभुषाही केली होती.

तुकडोजी महाराजांच्या शैलीत कोरोनावर भजन
तुकडोजी महाराजांच्या शैलीत कोरोनावर भजन

By

Published : Apr 10, 2020, 2:14 PM IST

चंद्रपूर- वेगवेगळ्या कार्यक्रमात अनेकांच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करून रसिकांच्या टाळ्या घेणाऱ्या छोटूलालने आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या शैलीत भजन गायले. भजनाव्दारे छोटूलालने कोरोनाबाबत जनजागृती केली. विशेष म्हणजे भजन गाताना त्याने तुकडोजी महाराजांसारखी वेशभुषाही केली होती.

या भजनाला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. कोरोनाचे सावट जगभर दहशत पसरवत आहे. देश टाळेबंद झाला असताना कोरोनासंदर्भात जनजागृती करण्यासाठी आपआपल्या परिने जो तो सरसावला आहे. यात कलाकारही मागे नाहीत. आपल्या कलेतून ते जनजागृती करत आहेत.

तुकडोजी महाराजांच्या शैलीत कोरोनावर भजन

राजूरा येथील हरहून्नरी कलाकार छोटूलाल सोमनकर यानी जनजागृती करण्यासाठी भजनांचा आधार घेतला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासारखी वेशभूषा करत त्याने संत तुकडोजी महाराजांच्या शैलीत भजन गायले. संचारबंदी असल्यामुळे रस्ते निर्मनुष्य झालेले आहेत. गर्दी टाळा व घरीच थांबा, असे आवाहन भजनातून छोटूलालने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details