चंद्रपूर - नागभीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मांगली येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी स्वप्नील पाल(वय 22) याच्याविरूद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
काही दिवसांपूर्वी मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीने मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. आरडाओरडा केल्यास किंवा घरी सांगितल्यास ठार मारण्याची धमकीदेखील तिला दिली होती. त्यानंतर, 23 नोव्हेंबरला मुलगी शाळेत जात असताना रस्त्यात अडवून आरोपीने तिला मारझोड केली.