महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 11, 2021, 8:52 PM IST

ETV Bharat / state

चंद्रपूर : चिमूर नगर परिषदेला टाळे ठोकणाऱ्यांना अटक

नगर परिषदेच्या लोखंडी गेट जवळ येवून जोर जोराने ओरडत गेटवरील दोन कर्मचाऱ्यांना हिलींग टच हॉस्पिटलवर कारवाई का केली नाही, असे विचारत असताना कामात व्यस्त असनारे अधिकारी कर्मचारी गेट जवळ आले. त्यांनी पोलीसांना फोन करून घटनेची माहिती दिली. यानंतर या सहाही जणांविरोधात तक्रार दिल्यानंतर अखेर त्यांना अटक करण्यात आली आहे.

चिमूर नगर परिषदेला टाळे ठोकणाऱ्यांना अटक
चिमूर नगर परिषदेला टाळे ठोकणाऱ्यांना अटक

चिमूर (चंद्रपूर) - बळजबरीने नगर परिषदेला टाळे लावून प्रशासकीय कामात अडथळा आणणाऱ्या व्यक्ती विरोधात चिमूर पोलिसात तक्रार देण्यात आली. तकारीनुसार चिमूर पोलिसांनी नगर परिषदेला टाळे ठोकणाऱ्या सहा आरोपींना रात्री अटक केली आहे. आज (मंगळवार) न्यायालयाने या सहाही आरोपींना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

चिमूर पोलीस


शासकीय कामात अडथळा

नगर परिषदचे अधिकारी व कर्मचारी सोमवार दिनांक १० मेला शासकीय कामकाज करीत होते. या वेळी सारंग दाभेकर (५२, रा. चिमूर), विलास मोहीनकर (वय ३०, रा. चिमूर), कैलास भोयर (वय ४२, रा. सोनेगाव), शैलेश भोयर (वय २२, रा. सोनेगाव), सिद्धांत कोब्रा (वय २७), आदर्श कोब्रा (वय २५, रा. नागभिड) हे नगर परिषदे पुढे जमले. त्यांनी नगर परिषदेच्या लोखंडी गेट जवळ येवून ओरडा ओरड करत गेटवरील दोन कर्मचाऱ्यांना हिलींग टच हॉस्पिटलवर कारवाई का केली नाही, असे विचारत गोंधळ घातला. परिषदेतील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना फोन करून घटनेची माहीती दिली. यानंतर या सहाही जणांविरोधात तक्रार दिल्यानंतर अखेर त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच सहाही जणांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा -'ऑनलाइन शॉपिंग' करताय सावधान..! 'सायबर' गुन्हेगार तुम्हाला फसवतील

ABOUT THE AUTHOR

...view details