चंद्रपूर - येथून ब्रम्हपुरीला ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जाणारी गाडी पलटी झाल्याची घटना घडली. गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यामध्ये एकजण जागीच ठार झाला. तर, दोनजण गंभीर जखमी झाले. ही घटना काल (दि. १२ मे. नागभीड-ब्रम्हपुरी) मार्गावर मध्यरात्री घडली. यामधील मृताचे नाव सागर वेटी असे आहे.
चंद्रपूर येथील शौकीनदास शिवाजी शंभरकर यांच्या मालकीची ही पीकअप गाडी आहे. गाडीचा नंबर MH-34-AV2027 असा आहे. ही गाडी चंद्रपूर येथील MIDC येथून ४४ सिलेंडर ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात असताना हा अपघात झाला. यामध्ये एक जणाचा जागीच मृत्यू झाला. गाडीचे चालक शशिकांत शंभरकर हे बुधवारी रात्री १०.३० वाजता एमआयडीसी चंद्रपूर येथून सिलेंडरने भरलेली गाडी घेऊन निघाले. पुढे सिंदेवाही या गावापर्यंत शशिकांत शंभरकर हेच गाडी चालवत होते. मात्र, त्यांना थकवा आल्याने त्यांनी त्यांच्या गाडीवर काम करणाऱ्या सुशांत सोरदे या व्यक्तीला गाडी चालवायला दिली. गाडीच्या मागील भागात सागर वेटी व सिद्धांत वाळके हे बसलेले होते. रात्री २.३० वाजताच्या सुमारास नागभीडवरून ब्रम्हपुरीकडे जाता असताना अचानक गाडीसमोर डुक्कर आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामध्येच गाडी रोडच्या खाली पलटी झाली. यामध्ये गाडीत मागे बसलेले सागर वेटी यांचा मृत्य झाला. दरम्यान नागभीड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खेडीकर हे करत आहेत.
ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जाणाऱ्या गाडीचा अपघात - vehicle carrying
चंद्रपूर येथून ब्रम्हपुरीला ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जाणारा पिक-अप पलटी झाल्याची घटना घडली. यामध्ये एकजण जागीच ठार झाला. तर, दोनजण गंभीर जखमी झाले. ही घटना काल (दि. १२ मे. नागभीड-ब्रम्हपुरी) मार्गावर मध्यरात्री घडली.
ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जाणाऱ्या गाडीचा अपघात