चंद्रपूर-चिमूर तालुक्यातील भिवकुंड येथे डोमनशेष महाराज सिद्धेश्वर मंदिरात २१ मार्चला अखंड हरिनाम सप्ताह व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पाहूण जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाच्या सुचनेनुसार मंदिरात होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह व महाप्रसाद कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे.
कोरोनामुळे भिवकुंड येथील डोमनशेष महाराज सिद्धेश्वर मंदिरातील कार्यक्रमे रद्द - domanshesh maharaj temple programs cancelled
चिमूर तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या भिवकुंड येथील डोमनशेष महाराज सिद्धेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील २१ मार्चला अखंड हरिनाम सप्ताह व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, राज्यात कोरोनाचा वाढता विस्तार लक्षात घेता मंदिरातील सदर नियोजित कार्यक्रमे रद्द करण्यात आली आहेत.
चिमूर तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या भिवकुंड येथील डोमनशेष महाराज सिद्धेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी २१ मार्चला अखंड हरिनाम सप्ताह व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहभर या मंदिरात अनेक कार्यक्रम होतात, त्यानिमित्त अनेक भाविक रात्रीच्या मुक्कामाने मंदिरात उपस्थित असतात, त्यामुळे मंदिरात गर्दी होऊन भाविकांना कोरोना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, मंदिरातील सदर नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आली आहेत. तरी सर्व भाविक भक्तांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन मंदिराचे प्रमुख हभप किशोर महाराज व भास्कर जामुनकर यांनी केले आहे.
हेही वाचा-विजेची तार पसरून चितळासह रानडुकराची शिकार; गोंडपिंपरीमधील घटना