चंद्रपूर -चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीला आव्हान देणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चक्क लग्नाच्या निमंत्र पत्रिकेतून दारूची बाटली देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
चंद्रपूर शहरात 15 डिसेंबरला एक लग्नसमारंभ पार पडला. चंद्रपूर शहरातील एनडी हॉटेल येथे हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेतून दारूची बाटली देण्यात आली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, व्हिडिओमध्ये एक डबा दिसतो आहे. डब्यात लग्नाची पत्रिका आणि त्याखाली दारूची एक बाटली, पाण्याची बाटली आणि फरसानची पुडी दिसत आहे.