चंद्रपूर- बेकायदा दारू विक्रीसाठी आणताना स्थानिक गुन्हे शाखेने एका युवकाला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून सुमारे साडेतीन लाखांचा दारूसाठा जप्त करण्यात आला असून, ही कारवाई वडसा-ब्रम्हपुरी ते चांदगाव मार्गावर पोलिसांनी केली.
हेही वाचा -'राम भी यहीं, रहीम भी यहीं', चंद्रपूरमध्ये ईदच्या रॅलीत घडले एकतेचे दर्शन
कल्लेसिंग संध्विंदरसिंग सल्लुजा (वय 25 मु. वडसा ता. वडसा जि. गडचिरोली) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून 3 लाख 60 हजार किमतीचा दारूसाठा तसेच एक सिल्वर रंगाची मारुती सुझुकी अंदाजे किंमत 5 लाख 50 हजार रुपये असा एकूण माल 9 लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा - वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून वनरक्षकाची आत्महत्या, कर्मचाऱ्यांचे आंदोलन
याबाबत अधिक माहिती अशी, की वडसा-ब्रम्हपुरी ते चांदगाव मार्गाने दारूची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार चांदगाव रस्त्यावर नहराच्या पुलावर नाकाबंदी केली. त्यादरम्यान एक सिल्वर रंगाची मारुती सुझुकी कंपनीच्या कारमधील (एमएच- 01- एसी- 9992) एक व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन जंगलाच्या दिशेने फरार झाला. तेव्हा पोलिसांनी गाडी चालक आरोपी कल्लेसिंग सल्लुजा याला अटक केली. तसेच गाडीमधून प्रत्येकी 100 नग असलेली 36 पेटी दारु जप्त करण्यात आली आहे.
ब्रम्हपुरी पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रम्हपुरी डिबी पथक उप पोलीस निरीक्षक अख्तर सय्यद, कुष्णा रॉय, संदेश देवगडे, अमोल गिरडकर, नितीन भगत, विजय मैंद, स्विखील उराडे, निलेश माहुर्ले, सैनिक अमोल ठेंगरी यांनी ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस निरीक्षक अख्तर सय्यद करत आहेत.