चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. चंद्रपूर शहराच्या अवतीभवती तर मोठे उद्योग त्यामुळे येथे प्रदूषणाची पातळी ही उच्च असते, त्यातही नोव्हेंबर महिना हा या वर्षीचा सर्वात प्रदूषित महिना म्हणून ठरला ( Air Pollution in November month in Chandrapur ) आहे. 30 दिवसांपैकी केवळ एकच दिवस हा प्रदूषणमुक्त ठरला तर 29 दिवस प्रदूषण हे धोकादायक पातळीपर्यंत पोचल्याची आकडेवारी सांगत आहे, त्यामुळे चंद्रपूर शहराचा प्रदूषणाचा ( Air Pollution in Chandrapur ) मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक प्रदूषण: राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये चंद्रपूर शहराचा समावेश होतो. शहराच्या परिसरात वीज उद्योग प्रकल्प, कोळसा खाणी, पोलाद उद्योग अशे अनेक उद्योग आहेत. त्यामुळे सामान्यापेक्षा प्रदूषणाची पातळी येथे नेहमी वाढलेली असते. त्यातही हिवाळ्यात हे प्रदूषण आणखी वाढलेले असते. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोव्हेंबर महिन्याच्या आकडेवारीत स्पष्ट होते. एकूण 30 दिवसाच्या महिन्यात 29 दिवस प्रदूषण आढळले तर केवळ 1 दिवस प्रदूषण मुक्त होता. गुणवत्ता पाहिल्यास 22 दिवस साधारण (Moderate) प्रदूषित तर 7 दिवस अत्यंत प्रदूषित (Poor) दिवस आढळले.
प्रदूषणाची सर्वोच्च पातळी: नोव्हेंबरमध्ये 1,7,11,15,22,29,30 या तारखांमध्ये मध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI 201 ते 280 ) असून हे दिवस अति प्रदूषित आढळले .19 नोव्हेंबर हाच एकमेव दिवस शहरासाठी चांगला होता तर उर्वरीत 22 दिवस अतिशय प्रदूषणाचे होते.(AQI- 165 ते 195)
अशी असते प्रदूषण पातळी -वायूप्रदूषणाची पातळी ही हवा गुणवत्ता निर्देशांकांत (Air quality index) या मापकात मोजली जाते. यामध्ये 0-50 चांगला, 51-100 साधारण प्रदूषित, 101-200 प्रदूषित तर 201-300 अति प्रदूषित व 301-400 धोकादायक मानली जाते.