महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bhajan Kirtan Programs : शासकीय कार्यालय दावणीला ; आधी माकडाची बांधली समाधी, आता कार्यालयात भजन कीर्तनाचे कार्यक्रम - शासकीय कार्यालयात माकडाची समाधी

चंद्रपूर जिल्हा कृषी संशोधन केंद्राचे कार्यालयात काही दिवसांपूर्वी जिल्ह्याचे कृषी अधीक्षक भाऊसाहेब बर्हाटे (Agriculture Superintendent Bhausaheb Berhate) यांनी माकडाची समाधी बांधली होती. त्यानंतर आता त्यांनी याच कृषी कार्यालयात काल रात्री भजन-कीर्तनाचा कार्यक्रम (Bhajan Kirtan programs at government offices) घेतला. हे शासकीय कार्यालय आहे की, त्यांची वैयक्तिक मालमत्ता असा प्रश्न आता कर्मचाऱ्यांना पडत आहे.

Bhajan Kirtan programs
चंद्रपुरात शासकीय कार्यालयात भजन कीर्तन

By

Published : Dec 16, 2022, 1:37 PM IST

चंद्रपुरात शासकीय कार्यालयात भजन कीर्तन

चंद्रपूर :जिल्ह्याचे कृषी अधीक्षक भाऊसाहेब बर्हाटेयांनी श्रद्धेच्या नावावर चक्क जिल्हा कृषी संशोधन केंद्राचे कार्यालय (Office of Agricultural Research Centre) दावणीला बांधले आहे. यापूर्वी 100 किलोमीटर दुर एका मेलेल्या माकडाला शासकीय कार्यालयात आणून त्याची समाधी बांधून तिथे पूजा अर्चना करण्याचा प्रताप त्यांनी केला (Bhajan Kirtan programs) होता. बर्हाटे यांच्या भोळ्या अतिरेकी भक्तीचा शासकीय कर्मचाऱ्यांना त्रास व्हायला लागला होता. याच कृषी संशोधन केंद्राच्या जागेवर त्यांची मंदिर बांधण्याची तयारी देखील केली होती, मात्र ईटीव्ही भारतने बातमी प्रकाशित करताच हा प्रयत्न तूर्तास बंद झाला. आता बर्हाटे यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. याच कृषी कार्यालयात काल रात्री भजन-कीर्तनाचा त्यांनी कार्यक्रम (Bhajan Kirtan programs at government offices) घेतला.

मानवतेचा संदेश :वास्तविक महाराष्ट्रातील महान संतांनी मानवतेचा संदेश याच माध्यमातून दिला. मात्र याच संतांनी सामाजिक भान देखील शिकवले, संत तुकारामांपासून तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराजांनी भाबड्या आणि आंधळ्या श्रद्धेवर कठोर प्रहार केला. मात्र याचा विसर जिल्हा कृषी अधीक्षक बर्हाटे यांना पडला असावा. म्हणूनच आधीच कृषी संशोधन केंद्राच्या जागेवर जिथे शेतीचे वेगवेगळे प्रयोग केले जातात. त्याच जागेवर एका माकडाची समाधी त्यांनी बांधली असल्याचा प्रकार ताजा असताना त्यांचा हा प्रकार देखील चर्चेचा विषय बनला आहे. हे शासकीय कार्यालय आहे की, त्यांची वैयक्तिक मालमत्ता असा प्रश्न आता कर्मचाऱ्यांना पडला (government offices at Chandrapur) आहे.



श्रद्धा-अंधश्रद्धेचे केंद्र : भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला आपला धर्म, श्रद्धा, उपासना पद्धतीचे अनुसरन करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र संविधानात वैज्ञानिक दृष्टिकोन देखील महत्वाचा मानला गेला आहे. म्हणूनच शासकीय कार्यालयांना धर्मविरहित ठेवण्यात आले आहे. जिल्हा कृषी अधीक्षक बर्हाटे यांनी या वैज्ञानिक दृष्टीकोनाला तिलांजली देत शासकीय कार्यालय आपल्या भाबड्या श्रद्धेच्या दावणीला बांधले असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यांच्या या वागणुकीचा आता येथील कर्मचाऱ्यांनाच त्रास होऊ लागला आहे. कारण त्यांनी आपल्या श्रद्धा-अंधश्रद्धेचे केंद्र हे आपल्या कृषी कार्यालयात बनवले आहे. येथे कृषी संबंधित कामाची चर्चा कमी आणि जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बर्हाटे यांच्या वागणुकीची चर्चाच अधिक होत आहे. काल सायंकाळी कार्यालय बंद झाल्यानंतर येथे भजन कीर्तनाचे आयोजन बर्हाटे यांनी केले. टाळ मृदंगाच्या भक्ती रसात ते बुडाले. मात्र याचे आयोजन त्यांनी स्वतःच्या घरी न करता शासकीय कार्यालयात केल्याने पून्हा बर्हाटे यांच्याबाबत उलटसुलट चर्चा होऊ लागली (Agriculture Superintendent Bhausaheb Berhate) आहे.




काय आहे प्रकरण :२९ नोव्हेंबरला भराटे नागपूर येथून चंद्रपूरला येत असताना वरोरा नजीक मार्गावर एक माकड अपघातात मृत झाल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक बर्हाटे यांना दिसले. मेलेले माकड वाहनात टाकून त्यांनी थेट कृषी अधिक्षक कार्यालय गाठले. रात्री नऊ वाजताच्या सुमाराला त्यांनी माकडाला विधिवत दफन केले. त्यानंतर त्यावर एक दगड ठेवून शेंदूर फासला. माकडाच्या समाधीवर दिवा लावण्याची जबाबदारी एका कर्मचाऱ्यावर दिली आहे. रोज रात्री या समाधीवर दिवा लावण्याचे काम एक कर्चमारी नित्येनेमाने करीत होते. ज्या परिसरात माकडाचे दफन करण्यात आले. तो कृषी संशोधन केंद्राचा परिसर आहे. आधुनिक शेतीसंदर्भात येथे वेगवेगळे प्रयोग केले जातात. बऱ्हाटे यांनी त्यांच्या कार्यालयातील कर्चचाऱ्यांची बैठक घेतली. यात त्यांनी माकडाचा विषय ठेवला. माकडाला श्राद्ध घालायचे आहे. त्यासाठी वर्गणी गोळा करु, असा प्रस्ताव त्यांनी कर्मचाऱ्यांसमोर ठेवला. शनिवारी या जेवणाच्या कार्यक्रम ठरला होता, मात्र ईटीव्हीची बातमी प्रकाशित होताच हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.


ही जबाबदारी बर्हाटे यांची :माकडाच्या समाधी स्थळाचे त्यांनी काँक्रीटीकरण केले, आता कार्यालयात भजन-कीर्तन कार्यक्रम ठेवला. शेवटी येणाऱ्या भजन मंडळीसाठी हे विश्वच त्यांना घर आहे, कणाकणात ईश्वर आहे. हे संतांनी सांगितलेले सत्य त्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे बर्हाटे यांनी त्यांना शासकीय कार्यालयात आमंत्रित केले, तरी त्यांना याचे काही वावगे वाटले नाही. त्यांनी सहज होकार दिला, भक्तीरसात तल्लीन होऊन त्यांनी भजन कीर्तन केले. त्यांनी वेगळे असे काहीच केले नाही. मात्र बर्हाटे यांनी यामुळे आपल्या अडचणीत वाढ होऊ शकते, याचे भान ठेवले नाही. याबाबत बर्हाटे यांच्याशी वारंवार संपर्क केला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details