चंद्रपूर - काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून सोमवारी शपथ घेतली. त्यांचा हा शपथविधी सोहळा गोंडपिपरी तालूक्यातील करंजी गावासाठी विशेष ठरला आहे. कारण गावच्या मातीत वाढलेला, आपल्या सोबत खेळलेला, शिकलेला माणुस मोठा झाला आणि राज्याचा कॅबिनेट मंत्री झाला, याचा आनंद वाटत असल्याचे विजय वडेट्टीवार यांच्या वर्गमित्रांनी सांगितले.
विजय वडेट्टीवार यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या वर्गमित्रांनी दिल्या शुभेच्छा हेही वाचा... अजितदादांचा 'हा' विक्रम पाहून तुम्हीही थक्क व्हाल...
विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्यातीळ गोंडपिपरी तालूक्यातील करंजी या गावचे सुपुत्र आहेत. आपल्या गावचा माणुस मंत्री झाला. गावाचे भुमिपुत्र असल्याने वडेट्टीवार यांचा शपथविधी सोहळा करंजी गावासाठी आनंदोत्सव ठरला. यावेळी वडेट्टीवारांच्या शालेय मित्रांनी त्यांच्या जून्या आठवणींना उजाळा दिला.
हेही वाचा... बाबांचे आशिर्वाद नेहमीच सोबत म्हणूनच इथपर्यंत पोहोचलो - अमित देशमुख
आमदार विजय वडेट्टीवार हे मूळचे गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावचे आहे. करंजी या गावीच त्यांचा जन्म आणि प्राथमिक शिक्षण झाले. गोंडपिपरीतील जनता विद्यालयात त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले. त्यांचे वडील करंजीचे सरपंच होते. मात्र, पुढे त्यांच्या वडिलांचे अचानक निधन झाले. त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांवर आभाळ कोसळले. या दरम्यानच्या काळात त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. बालपणापासूनच काहीतरी स्वताःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची जिद्द वडेट्टीवार यांच्या मनात होती, असे येथील गावकरी सांगतात.
हेही वाचा... राज्यपाल कोश्यारी के. सी. पाडवींवर संतापले, आदित्य ठाकरेंनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
वडेट्टीवार यांनी काही दिवसांनी कुटुंबियासह करंजी गाव सोडले. अन् गडचिरोली शहर गाठले. त्यानंतर एक एक टप्पा गाठत ते आमदार झाले. पुढे वनविकास महामंडळाचे अध्यक्ष झाले. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एक आक्रमक नेता, अशी त्यांनी ओळख संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण केली. पुढे पक्षाने त्यांना उपगट नेतेपद दिले. सर्वसामान्यांसाठी धावून जाणारा माणुस, अशी ओळख वडेट्टीवार यांची ओळख असल्याचे त्यांचे वर्गमित्र सांगतात.
हेही वाचा... भरणेंना मंत्रीपद देऊन अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांना धक्का
विजय वडेट्टीवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आणि करंजी गावात जल्लोष सूरु झाला. आपल्या गावातील माणुस मंत्री झाला, याचा आनंद सर्व गावाकऱ्यांमध्ये दिसत होता. करंजीत आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासोबत शिक्षण घेतलेले त्यांचे अनेक सवंगडी आहेत. त्यांनी आजही या मित्रांसोबत आपुलकीचे संबंध जपले आहेत.