चंद्रपूर - भाजप सरकार म्हणजे "दारु तीच केवळ बाटली बदलली" अशी टीका स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार अॅड. वामनराव चटप यांनी केली. सत्ताधारी भाजप सरकारने अनेक आश्वासने दिली. मात्र, दिलेल्या आश्वसनांची पुर्तता केली नाही. सरकारचे निर्णय शेतकऱ्यांसाठी मारक ठरले आहेत. काँग्रेसच्या काळात शेतकरी आत्महत्या झाल्याच पण भाजपच्या काळातही आत्महत्यांचा आकडा कमी झालेला नाही. गोंडपिपरीच्या धाबा येथील प्रचार सभेत ते बोलत होते.
हेही वाचा -हाताच्या सोबतीला "घड्याळ" दिसेना, राजूरा मतदारसंघात आघाडीत बिघाड?
राजूरा विधानसभेचे वातावरण तापू लागले आहे. नेत्यांच्या गावभेटींना वेग आला आहे. शेतकरी संघटना पुरस्कृत स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार अॅड. वामनराव चटप यांनी संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा येथे प्रचाराचा नारळ फोडला. प्रचारसभेतून चटप यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना चांगलेच चिमटे काढले. सरकारला जाब विचारण्यास विरोधक अपयशी ठरले आहेत. फडणवीस सरकार खोटारड्यांची फौज आहे. अशी बोचरी टिका चटपांनी केली.
हेही वाचा -अर्थमंत्री मुनगंटीवार यांची पत्रकार परिषद; भाजप-सेनेच्या आमदारांना निवडून देण्याचे आवाहन
दरम्यान, या सभेसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती नागपुरच्या रंजना मामर्डे, शशिकांत देशकर, सतिश दाणी, राजेश कवटे, तुकेश वानोडे हे उपस्थित होते.