चंद्रपूर - काळापैसा बाहेर काढण्यासाठी भाजपने नोटबंदी केल्याचे सांगितले जाते. मात्र, रिझर्व्ह बँक नोटबंदीचा १०० टक्के पैसा आल्याचे सांगतेय. मात्यार, सर्व काळा पैसा पांढरा कसा करण्यात आला? हे कुणीही सांगत नाही. काळा पैसा माझ्याकडेही आहे आणि हे मी लपवत नाही, असे धक्कादायक विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
'होय...माझ्याकडेही काळा पैसा आहे' हे वाचलं का? - भाजप हे लुटारू सरकार; प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजू झोडे यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर बल्लारपूर येथे आले होते. यावेळी ते बोलत होते.
आंबेडकर यांनी काँग्रेस-भाजपवर शरसंधान साधले. काँग्रेसवाले भुरटे चोर होते, तर भाजपवाले डाकू आहेत. आम्हाला भाजपची बी टीम म्हणणारे हेच काँग्रेसवाले शेवटच्या क्षणापर्यंत आमच्याशी युतीची वाट बघत होते. मुख्यमंत्री घाबरलेले आहेत. त्यांनी वंचित आघाडीविरोधी पक्ष असेल, असे भाकीत केले आहे. मात्र, यावेळी आम्ही सत्तेत बसू आणि भाजप विरोधी पक्ष म्हणून काम करेल, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
हे वाचलं का?- बाबासाहेबांच्या नातवाला पंतप्रधान केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही - नामदेव जाधव
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे चंद्रपूर निर्वाचन क्षेत्रातील उमेदवार अनिरुद्ध वनकर, राजुरा क्षेत्राचे गोदरू पाटील जुमनाके, बल्लारपूर क्षेत्राचे राजू झोडे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.