चिमूर(चंद्रपूर ) - जगभरातील पर्यटक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला नक्की भेट देतात. अनेक कलाकारही ताडोबा सफारीसाठी येत असतात. नुकतच दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्यचे पत्नी संमथासह ताडोबा सफारी केली.
दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्यची पत्नी संमथासह ताडोबा सफारी - Tadoba
दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्यने पत्नी संमथासह ताडोबा सफारी केली. त्यांना व्याघ्र दर्शन झाले नाही. आज सकाळी त्यांनी रिसोर्ट सोडून निरोप घेतला असून व्याघ्र दर्शनासाठी ते पुन्हा ताडोबा सफारीला येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

अभिनेता नागा चैतन्य पत्नी संमथासह चिमूर तालुक्यातील कोलारा गेट मधून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची सफारी करण्यासाठी गेला. त्या करीता त्यांनी चिमूर नजीकच्या बॉम्बु रिसोर्टमध्ये मुक्काम केला. रविवारी दुपारी वाजता त्यांनी जंगल सफारी केली. मात्र, त्यांना व्याघ्र दर्शन झाले नाही. आज सकाळी त्यांनी रिसोर्ट सोडून निरोप घेतला असुन व्याघ्र दर्शनासाठी ते पुन्हा ताडोबा सफारीला येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
ताडोबा अभयारण्याची भुरळ नेत्यांसह अभिनेत्यांना आहे. अनेक जण या अभयारण्याला भेट देत असतात.