चंद्रपूर - जामिनावर सुटून आलेल्या आरोपीची भर चौकात गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ( Accused Murder in Chandrapur ) ही घटना घुग्घुस येथे काल रात्रीच्या सुमारास घडली. कादिर शेख असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात सहा अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरचीपूड टाकून मारहाण -
तलवारीचा धाक दाखवल्याप्रकरणी कादिर शेख या 25 वर्षीय युवकाला अटक करण्यात आली होती. तो जामिनावर सुटून आला होता. काल रात्री तो बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर उभा असताना एका गाडीतून सहा जण अचानक त्याच्यावर चालून आले. त्यांनी त्याच्या डोळ्यात मिर्चीपुड टाकली आणि बेदम मारहाण केली. नंतर तो निपचित पडल्यानंतर त्याचा गळा कापून हत्या करण्यात आली. ही हत्या आपसी वादातून झाली असल्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा -Physical abused on minor : नराधमाचा तीन कोवळ्या मुलींवर अत्याचार; वर्ध्यातील संतापजनक प्रकार
तसेच ज्या वादासाठी तो तुरुंगात गेला होता त्या वादाची याला किनार आहे का त्या दृष्टीने पोलीस तपास सुरू आहे. ही घटना घडल्यानंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदनवार यांनी घटनास्थळी येऊन परिसराची पाहणी केली. याबाबत सहा अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अद्याप आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.