चिमूर (चंद्रपूर) - चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या महालगाव (काळू ) येथील नव्वद वर्षीय वृद्धेवर ३४ वर्षीय नराधमाने अत्याचार केला होता. या अमानवीय घटनेतील आरोपी नरेंद्र संभाजी नन्नावरे याला चिमूर येथील न्यायालयापुढे हजर केला असता, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
९० वर्षीय वृद्धेवर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमाला दोन दिवसांची पोलीस कोठडी - chandrapur crime news
नव्वद वर्षीय वृद्धेवर ३४ वर्षीय नराधमाने अत्याचार करणाऱ्या आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
चिमूर तालुक्याती महालगाव (काळू) येथील नव्वद वर्षीय वृद्ध महिला आपल्या घरी झोपली असताना घराशेजारी राहणारा नरेंद्र संभाजी नन्नावरे (३४) हा वृद्धेच्या घरात शिरला. त्यानंतर लाईट बंद करून त्यांनंतर त्यांने वृद्धेवर अतिप्रंसग करण्याचा प्रयत्न केला. वृद्धेने अत्याचाराची माहिती तिच्या पतीला दिली. महिलेच्या पतीने या घटनेची तक्रार भिसी पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नरेंद्र नन्नावरे विरोधात भादंविच्या कलम ३७६, ४५०, ३२३ नुसार गुन्हा नोंदवून त्याला २७ नोव्हेंबररोजी अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपीला न्यायालयाने हजर केले असता, न्यायालयाने त्याला ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा - बाबा रामदेव यांचे बंधु राम भारत होणार रुची सोयाचे एमडी; वार्षिक वेतन अवघा रुपया!