चंद्रपूर -राजुरा-बामणी मार्गावरील रेल्वे उड्डानपुलावर अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. मृताचे नाव मनोहर वेगीनवार असे असून त्यांचा मृतदेह राजुरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे.
राजुरा- बामणी मार्गावर रेल्वे उड्डानपुलावर अपघात, एकाचा मृत्यू - Chandrapur Police News
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा-बामणी मार्गावरील रेल्वे उड्डानपुलावर अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
राजुरा- बामणी मार्गावर रेल्वे उडानपुलावर अपघात, अपघातात एकाचा मृत्यू
राजूरा तालुक्यातील भुरकुंडा येथे मनोहर वेगीनवार यांची शेती आहे. चंद्रपूर येथून भुरकुंडा गावाला शेतीची पाहणी करण्यासाठी ते गेले होते. चंद्रपूरला परत जाण्यासाठी ते दूचाकीने निघाले असता राजूरा-बामणी मार्गावरील रेल्वे उडाणपुलावर त्यांचा गाडीला चारचाकी वाहनाने धडक दिली. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पुढील तपास राजूरा पोलीस करत आहेत.