चंद्रपूर - महानगरपालिकेने ( Chandrapur Municipal Corporation ) रेन वॉटर हार्वेस्टिंग ( Rain Water Harvesting ) सक्तीची केली आहे. यासंदर्भात मनपातर्फे जनतेला नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. सदर नोटीसमध्ये दहा दिवसात रेन वॉटर हार्वेस्टिंग न करणाऱ्या मालमत्ताधारकांवर वीस हजारांची दंडात्मक कारवाई करण्याची सूचना देण्यात आलेली आहे. मात्र, याला आम आदमी पक्षाने विरोध दर्शवला आहे. हा उपक्रम काळाची गरज आहे, त्यासाठी मनपाने जनजागृती मोहीम राबविणे गरजेचे होते. नागरिकांनी देखील याला प्रतिसाद दिला आहे. मात्र, असे न करता नागरिकांवर याचा भुर्दंड लावण्यात येत आहे, सर्वासामान्य नागरिकांवर हा अन्याय आहे, जर नागरिकांना असा त्रास दिला तर आप कडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. ( aap opposed fine on Rain Water Harvesting )
चंद्रपूर महानगर 3 झोनमध्ये विभागलेला आहे. अनेक झोनमध्ये कामगार वस्ती आहेत. ज्यात हातावर आणून पानावर खाणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा वेळी जवळून 8 ते 10 हजार खर्च करणे परवडणारे नसल्याने जनतेची तक्रार आम आदमी पार्टीकडे नागरिक करीत आहेत. शहराचे सचिव राजू कुडे यांच्या नेतृत्वात मनपाला निवेदनातून विनंती करण्यात आली.