चंद्रपूर -चिमूर तालुक्यातील सावरगावमध्ये मण्यार साप चावल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. रात्री झोपेत महिलेला सापाने दंश केला. सकाळी कुटुंबियांना महिला मृत अवस्थेत आढळली. गुंफा शत्रुघ्न कुमरे (वय ३८) असे मृत महिलेचे नाव आहे.
साप चावल्याने महिलेचा मृत्यू; सावरगाव येथील घटना - सावरगाव सर्पदंश मृत्यू
पावसाळा सुरू झाल्याने साप, विंचू आणि इतर विषारी प्राणी आढळण्याचे प्रमाण वाढलेले आहे. चिमूर तालुक्यातील सावरगावमध्ये मण्यार साप चावल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. रात्री झोपेत महिलेला सापाने दंश केला.

पावसाळा सुरू झाल्याने साप, विंचू आणि इतर विषारी प्राणी आढळण्याचे प्रमाण वाढलेले आहे. मृत गुंफा यांना रात्री सापाने दंश केला. त्यावेळी त्यांना जाग आली मात्र, आसपास काहीही दिसले नाही. त्यामुळे एखादा कीटक चावला असेल असे, कुटुंबीयांना सांगून त्या पुन्हा झोपल्या. सकाळी त्यांच्या पतीने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता त्या मृतावस्थेत आढळल्या.
सकाळी घरात शोधाशोध केली असता घरातील सामानामागे मण्यार जातीचा साप आढळला. नागरिकांनी सापला मारून टाकले असून मृत गुंफा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.