महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 11, 2022, 10:09 PM IST

Updated : May 12, 2022, 3:03 PM IST

ETV Bharat / state

A violent turn politics : सहकारी संस्थेच्या राजकारणाला हिंस्त्र वळण; काँग्रेसच्या तालुकाध्यक्षावर दरोडा, मारहाणीचा गुन्हा

भद्रावती येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या राजकारणाने आता हिंस्र वळण (A violent turn to co-operative politics) घेतले आहे. निवडणूक अधिकाऱ्याला चाकूचा धाक दाखवून, त्याला मारहाण करून दरोडा टाकल्याप्रकारणी भद्रावतीचे तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, काँग्रेसचा कार्यकर्ता गीतेश सातपुते आणि अन्य दोन जणांवर अजामीनपात्र गुन्हा ( Robbery and assault on Congress taluka president) दाखल करण्यात आला आहे.

Prashant Kale
प्रशांत काळे

चंद्रपूर:भद्रावती येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेची ( executive co-operative societies) निवडणूक सध्या होऊ घातली आहे. त्यासाठी उपलेखा परीक्षक असलेले रवी मांढळकर यांना निवडणूक अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. या संस्थेच्या व्यवस्थापन समितीची पुढील पाच वर्षांसाठीची निवडणुक होत असून त्याची प्रक्रिया सुरू आहे. यात गुन्हा दाखल झालेले चारही आरोपी सध्या फरार आहेत. भद्रावती येथे विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान हा गंभीर प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे या निवडणूक प्रक्रियेत सर्वात महत्वाचे कागदपत्रे घेऊन ते पसार झाले आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलीस यंत्रणा शोध घेत आहेत.

18 ते 22 एप्रिलपर्यंतनिवडणूकित सहभागी होऊ इच्छिनाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज दाखल करण्याचा अवधी होता. 25 एप्रिलला अर्जांची छाननी करण्यात आली. 50 पैकी 7 उमेदवारांचे अर्ज त्रुट्यामुळे नामंजुर करण्यात आले. यामुळे या गटातील म्हणजे शेतकरी परिवर्तन पॅनलचे समर्थक तसेच काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत काळे यांनी यावर आक्षेप घेत येथे चांगलाच गोंधळ घातला. या बाद सात पैकी पाच जणांनी 27 एप्रिलला भद्रावती सहाय्यक निबंधक एस. एच. संधू यांच्याकडे दाद मागितली. मात्र या अपीलमध्ये देखील त्यांचे अर्ज नामंजूर करण्याचा निर्वाळा देण्यात आला.

10 मे ला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता. यावेळी कार्यालयात प्रशांत काळे आणि दीपेश सातपुते हे होते. त्यांनी आमच्या गटातील ललित बदखल हा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी थोड्याच वेळात येत आहे त्यामुळे आपण ही प्रक्रिया बंद करू नका अशी विनंती केली. यावेळी तालुकाध्यक्ष काळे आणि काँग्रेस कार्यकर्ते सातपुते हे सतत फोनवरून बोलत होते, कार्यालयात येत-जात होते. त्यानंतर हे दोघे कार्यालयाबाहेर जाताच दोन अज्ञात व्यक्ती तोंडावर काळा दुपट्टा घालून कार्यालयात आले. त्यांनी आतून शटर बंद केले. एका मोठा धारदार चाकू काढून रवी माढळकर कोण अशी विचारणा केली.

कुणी पोलिसांना संपर्ककरू नये यासाठी टेबलावरील मोबाईल आपल्या ताब्यात घेतले. यानंतर त्यांनी संस्थेच्या महत्वपूर्ण फाईल्स, उमेदवारांचे अर्ज, निवडणूकसंबधी वरिष्ठ पातळीवर केलेला पत्रव्यवहार, इतर महत्वाची कागदपत्रे या फाईल्स ताब्यात घेतल्या. तसेच माढळकर यांची बॅग ज्यात कार्यालयाचा शिक्का, जिल्हा बँकेचे पासबुक होते, ती घेऊन पसार झाले. त्यापूर्वी त्यांनी ताब्यात घेतलेले मोबाईल फोडले. हा सामान्य दरोडा असू शकत नाही.

ही निवडणूक होऊ नये म्हणून प्रशांत काळे आणि गीतेश सातपुते यांनी संगनमत करून ही घटना घडवून आणली या आरोपावरून माढळकर यांनी भद्रावती पोलीस ठाण्यात याची तक्रार नोंदविकी असून हे दोघे आणि अन्य अज्ञात दोघांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणे, दरोडा टाकणे आणि संगनमत करून गुन्हा करणे अशा गंभीर कलम त्यात लावण्यात आले आहेत. याबाबत पोलीस निरीक्षक भरती यांनी दुजोरा दिला असून आरोपी फरार असल्याचे त्यांनी सांगितले.

संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेतव्यवस्थापक गोविंद ठाकरे यांना धक्काबुक्की आणि धमकी दिल्या प्रकरणी 18 एप्रिलला काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविला होता. भादवी कलम 504, आणि 506 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांकडून नवा गंभीर प्रकार घडल्याचे सामोरे आल्याने आता याची राजकिय चर्चा होऊ लागली आहे.


वरोरा-भद्रावती मतदारसंघातखा. बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) आणि रवी शिंदे यांचे राजकिय शत्रुत्व हे सर्वश्रुत आहे. रवी शिंदे हे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात आहेत. ते याच भद्रावती विविध कार्यकारी सहकारी संस्थेतुन नेमले जातात. जिल्हा बँकेत शिंदेचे वर्चस्व आहे. त्यांना राजकीय शह देण्यासाठी खासदार धानोरकर यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. शेतकरी परिवर्तन पॅनल हे खासदार धानोरकर यांचे समार्थीत आहे. यादरम्यान जिल्हा बँकेच्या भ्रष्ट आणि भोंगळ कारभाराबाबत त्यांनी थेट संसदेत प्रश्न विचारला होता, तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट सुद्धा घेतली होती. त्यामुळे जिल्हा बँक आणि सहकारी संस्थेचे राजकारण आता चांगलेच तापले असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

हेही वाचा : Leopard Attack : तीन वर्षीय चिमुरडीवर बिबट्याने मारली झडप.. आईने काठीने बदडून लावले पळवून

Last Updated : May 12, 2022, 3:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details