महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील एका वाघाला पकडण्यात यश, अन्य दोघांचा शोध सुरू - tiger was caught at Chandrapur

चंद्रपूरमध्ये काही काळापासून दहशत माजवणाऱ्या वाघाला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. वीज केंद्राच्या ऊर्जानगर वसाहतीतील न्यू एफ गाळा येथे या वाघाला पकडण्यात आले.

A tiger was caught at Chandrapur Coal Power Station
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील एका वाघाला पकडण्यात यश

By

Published : Feb 21, 2022, 10:39 PM IST

चंद्रपूर - चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात दहशत माजविणाऱ्या एका वाघाला पकडण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले आहे. वीज केंद्राच्या ( Chandrapur Super Thermal Power Station )ऊर्जानगर वसाहतीतील न्यू एफ गाळा येथे या वाघाला पकडण्यात आले.

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात मागील काही दिवसांपासून वाघाचे राजरोसपणे दर्शन होत होते. वाघाच्या हल्ल्यात एका कामगाराचा मृत्य झाला तर या परिसराला लागूनच असलेल्या दुर्गापूर येथे दुसऱ्या दिवशी बिबट्याने 16 वर्षीय मुलाला उचलून नेले होते. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली होती. या परिसरातील वाघांना जेरबंद करण्यासाठी राजकीय दबाव वाढू लागला होता. यासाठी राष्ट्रवादीचे नितीन भटारकर यांनी आमरण उपोषण पुकारले होते. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ( Minister of State Prajakta Tanpure ) यांनी देखील याबाबत तातडीने पाऊले उचलण्याचे निर्देश दिले होते. खासदार बाळू धानोरकर ( MP Balu Dhanorkar ) यांनी देखील बैठक घेऊन या वाघांना पकडण्यासाठी संयुक्त मोहीम राबविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. ऊर्जामंत्री नितीन राऊत ( Minister Nitin Raut ) यांनी देखील चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील घटनास्थळाची पाहणी करून वाघांना जेरबंद करण्याचे निर्देश दिले होते. आज (सोमवार) पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील याबाबत बैठक घेऊन सूचना केल्या. तीन वाघांना पकडण्याचे निर्देश वनविभागाला प्राप्त झाले होते. त्यानुसार वनविभाग आणि वीज केंद्राचे संयुक्त पथक तयार करून गस्त घालण्याचे काम सुरू होते.


यादरम्यान आज रात्री पर्यावरण चौकापासून काही अंतरावर हा वाघ दिसून आला. वनविभागाचे अजय मराठे यांनी या वाघाला डार्ट मारून बेशुद्ध केले, तर पशुवैद्यकीय अधिकारी खोब्रागडे यांनी वाघाची तपासणी केली. या वाघाला आता ट्रांजीट केंद्रात दाखल करण्यात आले. वाघाला पकडले गेल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी या परिसरात आणखी दोन वाघ आहेत त्यांना वनविभाग कधी पकडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details