चंद्रपूर - गोंडपिंपरी तालुक्यातील कोठारी परिक्षेत्रामधील बामणी गावातील एका शेतात वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळून आला आहे. बछड्याच्या मृत्यूमुळे वनविभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.
चंद्रपुरात मृतावस्थेत आढळला वाघाचा बछडा, वनविभागात खळबळ
बामणी गावाजवळील एका शेतातील उभ्या पिकांत हा बछडा मृतावस्थेत पडून असल्याचं सकाळी गावकऱ्यांच्या लक्षात आलं. याबद्दल ग्रामस्थांनी वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मृत बछड्याला शवविच्छेदनसाठी झरण येथे नेण्यात आले.
बामणी गावाजवळील एका शेतातील उभ्या पिकांत हा बछडा मृतावस्थेत पडून असल्याचं सकाळी गावकऱ्यांच्या लक्षात आलं. याबद्दल ग्रामस्थांनी वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मृत बछड्याला शवविच्छेदनसाठी झरण येथे नेण्यात आले. या बछड्या मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप कळलेलं नाही. वाघाचा हा बछडा साधारणपणे एक वर्षाचा असल्याचे सांगण्य़ात येत आहे.
तसेच, बामणी गावातील पुंडलिक मडावी या शेतकऱ्याच्या शेतात पट्टेदार वाघाचे साधारण एक वर्षाचे पिल्लू जखमी अवस्थेत आढळले. सकाळच्या सुमारास पुंडलिक मडावी नेहमीप्रमाणे शेतात पिकाची पाहणी करण्याकरिता गेले असता, त्यांना पिकांमध्ये वाघाचा जिवंत बछडा पडून दिसला. त्यांनी याबद्दल ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. तसेच ग्रामस्थांना भ्रमणध्वनीद्वारे याबाबत वनविभागालाही माहिती दिली.