चंद्पूर- सकाळी लवकर उठायचे, आपली काम पूर्ण करुन आठ वाजता नगरपंचायत गाठायची. हातात माईक घेउन जनजागृती करणारे संदेश देत निघायचे. दुपारी जेवण करायचे आणि पुन्हा संध्याकाळी सात वाजेपर्यत काम करायचे. गेल्या दहा दिवसापासून तो निरंतरपणे हे काम करतोय. गळा सुकला मात्र, पठ्ठ्याने हिमंत हारली नाही. हे काम नोकरी म्हणून नाही, तर जनसेवा म्हणून करतोय, असे रमेश कुमरे हा अवलिया सांगतो.
गेल्या 10 दिवसांपासून कोरोनाविषयी जनजागृती करतोय 'हा' अवलिया - public awareness gondpimpari Chandrapur
कोरोना व्हायरसने जगभरात अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण असल्याने प्रचंड चिंतेचे वातावरण आहे. अशात लोकांनी घराराबाहेर पडू नये यासाठी प्रशासनाकडून जनजागृती सुरू आहे. जिल्हा प्रशासन लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे .

गोंडपिपरीतील रमेश कुमरे हे नगरपंचायतीत शिपाई म्हणून काम करतात. कोरोना व्हायरसने जगभरात अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण असल्याने प्रचंड चिंतेचे वातावरण आहे.अशात लोकांनी घराराबाहेर पडू नये यासाठी प्रशासनाकडून जनजागृती सुरू आहे. जिल्हा प्रशासन लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे .याचाच एक भाग म्हणून गोंडपिपरी नगरातही जनजागृती केली जात आहे. रमेश कुमरे यांना नगरपंचयातीने जनजागृती संदेशाची जबाबदारी दिली. ती जबाबदारी या संकटकाळात जनसेवा म्हणून कुमरे पार पाडत आहेत. सकाळी आठ ते सायंकाळी सातपर्यत नगरातील गल्लीगल्लीत ते माईकव्दारे सातत्याने संदेश देत आहेत. गेल्या दहा दिवसांपासून त्यांचा हा संदेशाचा प्रवास निरंतरपणे सुरू आहे.
कोरोनाला हरवण्याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे. त्यामुळे गळा सुकला तरी निरंतरपणे आपले काम सुरूच ठेवणार असल्याचे कुमरेंनी सांगितले. कोरोनाच्या लढाईत प्रशासनातील विविध यंत्रणा प्रचंड मेहनत घेत आहेत. अशावेळी नगरपंचायतीच्या एका शिपायाचा हा लढाही अतिशय महत्वपुर्ण ठरला आहे. समाजातील प्रत्येक घटक जागृत राहिला व शासनाच्या निर्देशाचे पालन केले तर आपण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखू शकतो, असे कुमरे सांगतात.