चंद्रपूर - राजूरा तालूक्यातील टेंभुरवाही येथे रानडुकराचा कळपाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. गुरुदेव चंदू अंचलवार असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
हेही वाचा -गुलाबी चेंडू 'रिव्हर्स स्विंग' होण्यासाठी करण्यात आलाय 'हा' उपाय

गुरुदेव अंचलवार आपल्या दुचाकीने (क्रमांक MH ३४ AY ५४५९) सूबई येथे जात होते. टेंभुरवाही गावाजवळील वळणावर रानडुकराच्या एका कळपाने अंचलवार यांच्या दुचाकीला धडक दिली. यात अंचलवार यांना गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच विरुर पोलीस तेथे हजर झाले.
अंचलवार यांना तातडीने राजूरा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.