चंद्रपूर - कंपनीने जमीन लूटली. मोबदला दिला नाही. ज्या जमिनीवर कुटूंबाला दोन घास मिळत होते. ती जमीन गेली. कुटूंबावर उपासमारीची वेळ आली. अशात घरातील वृद्ध व्यक्ती आजारी पडला. उपचारासाठी पैसे नव्हते. उपचारासाठी "भिक द्या भाऊ भिक" अशी हाक कुटूंबाने दिली. सरकारला ही हाक ऐकूच आली नाही. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, शरीर उपचारासाठी प्रतिसाद देत नसल्याने कुटूंबीय घराकडे निघाले. पोलीस ठाण्यासमोर रुग्णवाहिका उभी झाली. बा..! सरकार..! आता तरी न्याय द्या. हीच शेवटची इच्छा..! अशी कळकळीची विनंती प्रकल्पग्रस्त वृद्धाने केली.
बा..! सरकार न्याय द्या; मृत्यूचा दारात उभे असलेल्या वृद्धाची हाक - chandrapur man agitation for land
राजूरा तालुक्यातील कुसुंबी गावातील अनेक आदिवासी कोलाम बांधवाची शेतजमीन माणिकगड कंपनीने हडपल्याचा आरोप आहे. कुसूंबी गावातील देऊ कुळमेथे यांची आठ एकर शेतजमीन माणिकगड सिमेंट कंपनीने बळकावले असल्याचे कुटूंबीय सांगत आहेत. शेती हेच कुटूंबाचा उदर्निवाह करण्याचे एकमेव साधन होते. जमीन गेल्याने अख्खे कुटुंब उघड्यावर पडले. उपासमारीची पाळी आली.
हेही वाचा -VIDEO: शौचास जाणाऱ्या वृद्धाचा क्रेनच्या धडकेत मृत्यू
राजूरा तालुक्यातील कुसुंबी गावातील अनेक आदिवासी कोलाम बांधवाची शेतजमीन माणिकगड कंपनीने हडपल्याचा आरोप आहे. कुसूंबी गावातील देऊ कुळमेथे यांची आठ एकर शेतजमीन माणिकगड सिमेंट कंपनीने बळकावले असल्याचे कुटूंबीय सांगत आहेत. शेती हेच कुटूंबाचा उदर्निवाह करण्याचे एकमेव साधन होते. जमीन गेल्याने अख्खे कुटुंब उघड्यावर पडले. उपासमारीची पाळी आली. मोल मजूरी केल्यावर दोन घास पोटात जात आहेत. अश्यात घरातील वृद्ध माणुस आजारी पडला. हातात पैसे नाही. तहसिल कार्यालयासमोर वृध्द देऊ कुळमेथे यांना खाटेवरच नेण्यात आले. उपचारासाठी "भिक द्या भाऊ भिक" अशी हाक कुटूंबियांना दिली. ही हाक भिकेची नव्हती तर न्यायासाठी होती. मात्र, प्रशासनाला कुळमेथे कुटूंबीयांच्या वेदना कळल्या नाही. शेवटी पोलिसांनी देऊ कुळमेथे यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. उपचाराला शरीर प्रतिसाद देत नसल्याने त्यांना कुसूंबी गावाला कुटूंबीयांना आणले आहे.
ही शेवटची इच्छा..!
माणिकगड सिमेंट कंपनी प्रशासनाच्या शोषणामुळे माझे अख्खे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. कुटुंबावर भीक मागण्याची वेळ आली. कित्येक वर्षांपासून न्याय हक्कासाठी सतत संघर्ष सुरू आहे. आमची उपासमार, वेदना शासनाला कळल्या नाहीत. आयुष्याच्या शेवटचा टप्यावर मी उभा आहे. मरणापुर्वी विनंती आहे, माझ्यावर झालेल्या अन्यायाची शिक्षा म्हणून, माणिकगड सिमेंट कंपनी विरूद्ध कायदेशीर कारवाई करा. माझ्या कुटुंबाला न्याय द्या. गडचांदूर पोलिसांना दिलेल्या निवेदनात देऊ कुळमेथे यांनी आपल्या वेदना मांडल्या आहेत.
संघर्षाला सीमा नाही...
मृत्यूचा दारात उभे असलेल्या कुळमेथे यांनी २०१३ पासून त्यांच्यावर झालेले अन्याय व जमीनी हिरावल्या संबंधी अनेक तक्रारी पोलीस व महसूल प्रशासनाकडे केल्या. न्याय मागणीसाठी राजूरा येथे 11 दिवस आमरण उपोषण केले. पोकळ आश्वासनाशिवाय हाती काहीच आले नाही. त्यांचा आवाज शासनाला अथवा लोकप्रतिनीधींना ऐकू गेला नाही. संघर्ष करणारे शरीर थकले. कुळमेथे आजारी पडले. त्यांच्या उपचारासाठी कुटूंबाकडे पैसे नाही. कुटुंबानी वैतागून आजारी देऊ कुळमेथे यांना खाटेसहीत राजूरा उपविभागीय अधिकारी कार्यालयापुढे ठेवून भिकमांगो आंदोलन केले. तसेच दोषींवर कारवाईची मागणी केली. त्यावेळी वृद्ध कुळमेथे यांना पोलिसांनी खाटेवरुन उचलून जिल्हा रुग्णालयात भरती केले. मात्र, उपचाराला उशिर झाल्याने देऊ कुळमेथे यांची प्रकृती अत्यंत खालावली. उपचारास शरीर प्रतिसाद देत नसल्याने त्यांना स्वगावी आणण्यात आले आहे.
हेही वाचा -#Video: धक्कादायक.. पाण्याच्या टाकीवरुन उडी मारुन केली आत्महत्या