चंद्रपूर - चिमूर येथे बैल धुवायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अंबीका पॉवर कंपनीच्या शेजारील उमा नदीवरच्या बंधाऱ्यावर ही घटना घडली. मंगळवारी सायंकाळी ही घटना उघडकीला आली. आकाश राजु गौरकर (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे .
उमा नदीच्या बंधाऱ्यात बैल धुवायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; चिमूर येथील घटना - chimur boy died in water
बैल धुण्यासाठी उमा नदीच्या बंधाऱ्यावर गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी ही घटना उघडकीला आली. आकाश राजु गौरकर (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे .
चिमूर शहरातील आझाद वार्ड येथे आई-वडिलांसोबत राहणारा आकाश गौरकर हा आसीफ शेख यांच्याकडे बैल चारण्याचे काम करतो. नेहमीप्रमाणे आकाश बैल घेऊन गेला होता. बैल चारून झाल्यानंतर बैलांना धुण्याकरता त्याने अंबीका पॉवर प्लँटच्या बाजूला असलेल्या उमा नदी पात्राकडे नेले. बैल धुताना पाय घसरल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
या घटनेदरम्यान त्याच्या सोबत असलेल्या तरूणाने आकाशच्या घरी आणि त्याचे मालक आसीफ शेख यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक स्वप्नील धुडे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. चार पोहणाऱया नागरीकांच्या मदतीने आकाशचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. उत्तरीय तपासणीसाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात त्याचा मृतदेह पाठवण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास चिमूर पोलीस करत आहेत.