चंद्रपूर- पोहायला गेलेल्या 12 वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना पोंभुर्णा तालुक्यातील भटारी या गावात घडली. कार्तिक मारोती कोवे असे मृत मुलाचे नाव आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
पोहायला गेलेल्या 12 वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू; पोंभुर्णा येथील घटना - पोभूर्णा लेटेस्ट न्यूज
रविवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे कार्तिक कोवे हा पोहण्यासाठी तलावावर गेला होता. पोहता पोहता तो खोल पाण्यात गेला. मात्र, थोड्यावेळाने तो पाण्यात बुडू लागला.
भटारी गावापासून काही अंतरावर एक तलाव आहे. येथे गावातील अनेक मुले पोहायला जातात. रविवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे कार्तिक कोवे हा पोहण्यासाठी तलावावर गेला होता. पोहता पोहता तो खोल पाण्यात गेला. मात्र, थोड्यावेळाने कार्तिक हा खोल पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच काही मुलांनी तत्काळ गावात येऊन याबाबतची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर नागरिकांनी कार्तिकला वाचविण्यासाठी तलावाकडे धाव घेतली. परंतु या दरम्यान कार्तिकचा मृत्यू झाला होता.
या घटनेत एका लहान मुलाचा जीव गेल्याने गावात शोककळा पसरली आहे. याबाबतची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे.