चंद्रपूर- चिमूर तालुक्यातील नेरी पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या उसेगांव येथे झाडाला गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सकाळी ११ .३० च्या दरम्यान म्हसली शेतशिवारात हा प्रकार घडलाय. विनायक चीरकुटा गायकवाड असे मृताचे नाव असून ते ६० वर्षांचे होते.
चिमूरमध्ये शेतात गळफास लावून एकाची आत्महत्या; कारण अस्पष्ट - chimur police
चिमूर तालुक्यातील नेरी पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या उसेगांव येथे झाडाला गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सकाळी ११ .३० च्या दरम्यान म्हसली शेतशिवारात हा प्रकार घडलाय. विनायक चीरकुटा गायकवाड असे मृताचे नाव असून ते ६० वर्षांचे होते.
चिमूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या उसेगाव येथे ते बहिणीकडे पाच वर्षांपासून वास्तव्य करत होते. त्यांनी सकाळी ११.३० च्या दरम्यान म्हसली रस्त्यावर असलेल्या सिद्धार्थ राजेश्वर डांगे यांचे शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. यावेळी शेतात कामासाठी गेलेल्या नातेवाईकांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी पोलीस पाटलांना अधिक माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच त्यांची बहीण व नातलग शेतावर गेले.
पोलीस पाटलांनी चिमुर पोलिसांना देखील संबंधित प्रकाराची माहिती दिली. यानंतर उप-पोलीस निरीक्षक कांता रेजीवाड, किरण मेश्राम, पोलीस कर्मचारी कैलास आलाम, रोशन तामशेटवार यांनी पंचनामा केला. सर्व प्रक्रियेनंतर मृतदेह चिमूर येथे शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. अद्याप मृत्यूचे कारण अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत.