चिमूर (चंद्रपूर) - 50 हजारांच्या खंडणीसाठी भोजनालयाच्या मालकाला धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भोजनालयाचे मालक गोपीचंद टेंभूरकर यांनी चिमूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
काय आहे प्रकार?
गोपीचंद टेंभूरकर यांची गेल्या 35 वर्षांपासून येथील सात नाल्याला लागून 'सद्भावना भोजनालय' नावाची हॉटेल आहे. ही हॉटेल अतिक्रमीत जागेत आहे. हे अतिक्रमीत हॉटेलच्या जागेचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. लॉकडाऊन पूर्वी शेखर जनबंधू भोजनालयात ग्राहक म्हणुन आला होता. त्यांनी या जागेची विचारपुस केली. प्रकरण न्यायालयात सुरू असताना स्टे मिळाल्याच्या झेराक्स प्रती मागितल्या. त्याचा आधार घेऊन चंद्रपूर जिल्हाधिकारी यांचेकडे परस्पर अर्ज केला. त्यामुळे अर्जावर विचार करत जिल्हाधिकारी यांनी चिमूर उपविभागीय अधिकारी यांना अतिक्रमित जागेचा अहवाल मागितला. याची एक प्रत शेखर जनबंधू यांना देण्यात आली. यानंतर भोजनालय मालक गोपीचंद टेंभूरकर यांना पैशाची मागणी केली.