महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजुरा येथे ५० खाटांचे ऑक्सिजनयुक्त कोविड केअर सेंटर मंजूर, आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नांना यश - चंद्रपूर कोविड सेंटर

राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोनावर मात करण्यासाठी 50 खाटांचे ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर मंजूर झाले आहे. त्याचबरोबर बामणी राजुरा लक्कडकोट रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 13.50 कोटी, राजुरा ते गोविंदपूर रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी 20 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.

covid care center
कोविड केअर सेंटर

By

Published : Nov 10, 2020, 3:10 PM IST

चंद्रपूर -राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोनावर मात करण्यासाठी 50 खाटांचे ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर मंजूर झाले आहे. याप्रमाणे राजुरा तालुक्यात विकासाच्या योजना मंजुर केल्या. यामध्ये अर्थ संकल्प 2020-21 मध्ये 17.50 कोटींची कामे मंजुर झाली. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

बामणी राजुरा लक्कडकोट रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 13.50 कोटी, राजुरा ते गोविंदपूर रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी 20 कोटी, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत उमरझरा ते बापुनगर कोलामुडा येथे 1 कोटी 50 लक्ष, विहीरगाव ते अमृतगुडा रस्त्यासाठी 15 कोटी, प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना अंतर्गत 1 कोटी 51 लक्ष, ग्राम विकास निधी अंतर्गत 2 कोटी 41 लक्षची कामे, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत 32 लाख, ठक्कर बापा योजनेअंतर्गत 12.50 लक्ष, केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत पुलाचे बांधकामाकरीता 24 कोटीच्या कामांसाठी मंजुरी देण्यात आली आहे.

राजुरा नगर परिषद वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजने अंतर्गत 4 कोटी मंजूर केले. राजुरा शहरातील इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळा इमारत बांधकामासाठी 1 कोटी मंजूर, राजुरा नगर परिषदेला रस्ता अनुदानासाठी 35 लक्ष मंजुर करण्यात आला. राजुरा येथील वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत सरदार पटेल लायबरी येथे सौंदर्यीकरण करणेसाठी एक कोटी मंजूर केले. मुख्याधिकारी अग्निशमन निवास बांधकामासाठी 59 लक्ष मंजूर केली. आमदार निधी अंतर्गत राजुरा नगर परिषदेला स्वर्ग रथ उपलब्ध करून देण्यासाठी 13 लक्ष मंजुर, 15 वा वित्त आयोगामधून 44 लक्ष मंजुर, राजुरा नगर परिषदेला नागरोत्थान योजनेअंतर्गत 46 लक्ष मंजुर, पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 96 लक्ष उपलब्ध झाले. नागरी दलितेत्तर योजनेअंतर्गत 36 लक्ष रस्ते नाल्या बांधकामासाठी उपलब्ध झाले.

तलाव सौंदर्यीकरणाचे रखडलेले काम पूर्ववत सुरु होणार आहे. राजुरा उपविभागातील भोगवटा वर्ग २ चे १ मध्ये रुपांतर करण्याबाबतची प्रक्रिया गेली पाच वर्षापासून थंड बस्त्यात होती. ते पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाकडे पाठपुरावा सुरु आहे. वाघाच्या हल्यात मुत्यू पावलेल्या १० पीडित कुटुंबियांना प्रत्येकी १५ लक्ष रुपयाची आर्थिक देण्यात आली. अशी माहिती राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी दिली.

या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादा पाटील लांडे, अशोकराव देशपांडे, हमीदभाई, नगराध्यक्ष अरुण धोटे, कार्यकारी नगराध्यक्ष सुनील देशपांडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, राजुरा तालुका काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष रंजन लांडे, नगरसेवक हरजितसिंग संधू, आनंद दासरी, महिला काँग्रेस अध्यक्षा कविता उपरे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष शेन्डे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अशोक राव, माजी नगरसेवक प्रभाकर येरने, पंढरी चंन्ने यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details