चंद्रपूर- दिल्लीच्या मरकजमध्ये झालेल्या तबलिग जमातच्या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील 39 जण सहभागी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील चार जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून उर्वरित लोकांचा शोध सुरू आहे.
दिल्लीतील मरकजमध्ये चंद्रपुरातले 39 जण!, चौघे विलगीकरण कक्षात - चंद्रपूर बातमी
दिल्लीच्या मरकजमध्ये झालेल्या तबलिग जमातच्या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील 39 जण सहभागी होते. त्यातील चौघांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर उर्वरित 35 जणांचे फोन बंद असून त्यांचा शोध सुरू आहे.
दिल्लीच्या निजामुद्दीन येथे तबलिग जमातीच्या धार्मिक कार्यक्रमात कोरोनाग्रस्त रुग्ण असल्याचे आढळल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. यात जिल्ह्यातील 39 जण सहभागी झाले असल्याची धक्कादायक माहिती प्रशासनाला मिळाली आहे. यातील सर्व लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू असून यातील चार जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून त्यांच्या तपासणीचे नमुने पाठविण्यात आले आहे. या 35 जणांच्या यादीत काहींचे फोन बंद आहेत.
हेही वाचा -दिल्लीतील कार्यक्रमाला रत्नागिरीतीलही 8 ते 10 जण ?