चंद्रपूर - जिल्ह्यात मागील 24 तासांत 39 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 27 हजार 477 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात 125 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांची रुग्णालयातून सुटी करण्यात आली आहे.
2 लाख 71 हजार 655 नमुन्यांची तपासणी
जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 71 हजार 655 जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 लाख 40 हजार 731 नमुने निगेटिव्ह आले आहे.
25 हजार 62 कोरोनामुक्त तर 1 हजार 990 सक्रिय रुग्ण
आतापर्यंत 25 हजार 62 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 1 हजार 990 सक्रिय रुग्ण जिल्ह्यात असून बाधितांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.