महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपूर : रविवारी 215 रुग्णांची भर; पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1257 वर - चंद्रपूर कोरोना अपडेट

चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 94 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 215 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे.

new corona positive patient
new corona positive patient

By

Published : Mar 21, 2021, 6:48 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात मागील 24 तासात 94 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 215 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 25 हजार 733 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 24 हजार 66 झाली आहे. सध्या 1257 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 50 हजार 919 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 19 हजार 824 नमुने निगेटीव्ह आले आहेत. आज मृत झालेल्यांमध्ये बालाजी वार्ड, चंद्रपूर येथील 60 वर्षीय पुरूष व ढुमने लेआऊट, गडचांदूर, येथील 73 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 410 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 371, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.


आज बाधित आलेल्या 215 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 81, चंद्रपूर तालुका सहा, बल्लारपूर 18, भद्रावती 17, ब्रम्हपुरी दोन, नागभीड 17, सिंदेवाही दोन, मूल सहा, सावली पाच, गोंडपिपरी दोन, राजुरा सात, चिमूर 11, वरोरा 29, कोरपना 11, व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातून आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details