चंद्रपूर - चिमूर तालुक्यातील नेरी गावात विजेचा शॉक लागून 2 गाईंचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज (मंगळवारी) सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. एक महिन्यापासून मोकळ्या असलेल्या तारांवर जिवंत तारा पडल्याने ही घटना घडली आहे. त्यामुळे विद्युत विभागा विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
चिमुरमध्ये विजेचा धक्क्याने दोन गाईंचा मृत्यू
एक महिन्यापासून मोकळ्या असलेल्या तारांवर जिवंत तारा पडल्याने ही घटना घडली आहे. त्यामुळे विद्युत विभागा विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शामराम गायकवाड यांच्या शेतातून गायीला चरायला गुराखी नेत असताना सकाळी विजेच्या धक्काने गाईंचा मृत्यू झाला.
नेरी येथील नदीकडील भागातील विद्युत तारा बदलण्याचे काम एक महिन्यापुर्वी सुरू होते. या ठिकाणी जुन्या तारा काढून तशाच मोकळ्या टाकल्या होत्या. शेजारी नविन विद्युत तारा टाकून विज पुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र, रविवारी रात्री आलेल्या वादळाने मोकळ्या टाकलेल्या तारा उडून वीज पुरवठा करण्याऱ्या जिंवत तारांवर पडल्या व त्यात विद्युत प्रवाहित झाली. त्यामुळे नेहमीप्रमाणे शामराव गायकवाड यांचे शेताजवळून नदी काठावर गायी चरायला गुराखी नेत असताना या तारांचा स्पर्श झाल्याने गुनाबाई मुंडरे व संजय जिवतोडे यांच्या प्रत्येकी एक गाईचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.