महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 11, 2020, 8:19 PM IST

ETV Bharat / state

निलेश गोटे हत्या प्रकरणी 2 आरोपींना अटक

शहराजवळच्या म्हाडा कॉलनीमध्ये 10 जूनच्या रात्री 10.30 ते 11 वाजण्याच्या सुमारास कॉलनीमधील काही युवकांनी चाकूने हल्ला चढवत निलेश गोटे या युवकाची हत्या केली होती.

Chandrapur Crime News
चंद्रपूर गुन्हे बातमी

चंद्रपूर - म्हाडा कॉलनीतील एका युवकाचा चाकूने हल्ला करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी दोन आरोपींना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. निलेश गोटे, असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. अंकित बंडु देहारकर आणि शुभम सुधाकर देहारकर अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहराजवळच्या म्हाडा कॉलनीमध्ये 10 जूनच्या रात्री 10.30 ते 11 वाजण्याच्या सुमारास कॉलनीमधील काही युवकांनी चाकूने हल्ला चढवत निलेश गोटे या युवकाची हत्या केली होती. चाकूने हल्ला होत असताना निलेशच्या वडिलांनी हल्ला करणाऱ्या युवकाचा चेहरा बघितला होता. मृत निलेशने श्वास सोडण्यापूर्वी वडिलांना हल्ला करणाऱ्या युवकाचे नाव सांगितले. देहेकर यांनी व त्याच्या मित्रांनी हल्ला केला, असे निलेशने सांगितले. हल्ला करणारे 3 ते 4 युवक असल्याची माहिती मृत निलेशच्या वडिलांनी दिली.

या प्रकरणात रामनगर पोलिसांनी मुख्य आरोपी अंकित बंडु देहारकर व शुभम सुधाकर देहारकर (रा. दाताळा नवीन वस्ती चंद्रपूर) यांना 12 तासाच्या आत अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक संदिप कापडे, सहायक फौजदार माहुलीकर, पोलीस हवालदार परचाके, कांबळी आणि गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.

ABOUT THE AUTHOR

...view details