चंद्रपूर - स्थलांतरित मजुरांनी आता गटागटाने आपल्या स्वगावी परत जाणे सुरू केले आहे. अनेक ठिकाणी अशा मजुरांना क्वॉरंटाईन करण्यात आले. तेलंगाणातून आलेल्या अशाच 16 मजुरांना क्वॉरंटाईन करण्यात आले. ते छत्तीसगड राज्यातील स्वगावी जात होते.
तेलंगाणातून आलेल्या 16 मजुरांना केले क्वॉरंटाईन, छत्तीसगडला निघाले होते पायी
शहरातील पठाणपुराद्वारे मार्गावरील हनुमान मंदिराजवळ काही लोक हातात गाठोडे घेऊन जाताना काही लोकांना दिसले. त्यांच्यासोबत महिला आणि लहान मुलेही होती. विचारणा केली असता आपण तेलंगाणा हैदराबाद येथून आलो असून छत्तीसगड येथील बालाघाट येथे जात असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील पठाणपुराद्वारे मार्गावरील हनुमान मंदिराजवळ काही लोक हातात गाठोडे घेऊन जाताना काही लोकांना दिसले. त्यांच्यासोबत महिला आणि लहान मुलेही होती. विचारणा केली असता आपण तेलंगाणा हैदराबाद येथून आलो असून छत्तीसगड येथील बालाघाट येथे जात असल्याचे त्यांनी सांगितले. ही माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली. त्यानुसार या सर्वांची आरोग्य तपासणी करून क्वॉरंटाईन करण्यात आले.
तेलंगाणा राज्यात हजारोंच्या संख्येने मजूर अडकले आहेत. यात महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातील मजुरांचा समावेश आहे. हे मजूर आता आपल्या गावी लपून प्रवास करू लागले आहेत. जिल्ह्यात अद्याप एकही रुग्ण सापडला नाही त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या लोकांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.