महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

130 कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक कंत्राटी कर्मचारी सेनेत प्रवेश - Chandrapur Coal Power Station Latest News

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील 130 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शिवसेना प्रणित महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक कंत्राटी कर्मचारी सेनेत प्रवेश केला आहे. जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हा कार्याध्यक्ष कैलाश तेलतुंबडे यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडला.

Contract employees join Shiv Sena
कंत्राटी कर्मचाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

By

Published : Dec 13, 2020, 8:41 PM IST

चंद्रपूर - चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील 130 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शिवसेना प्रणित महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक कंत्राटी कर्मचारी सेनेत प्रवेश केला आहे. जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हा कार्याध्यक्ष कैलाश तेलतुंबडे यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडला.

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात अनेक मोठ्या कंपन्यांची कामे चालतात. यासाठी कंत्राटी पद्धतीने कामगार आणि कर्मचाऱ्यांची भरती केली जाते. अशा कर्मचाऱ्यांना कामगार कायद्यानुसार पगार आणि सुविधा मिळणे आवश्यक आहे. तसेच त्यांना सुरक्षेसाठीचे सर्व साधने उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र, अनेकदा या कर्मचाऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवले जाते. मागणी केली असता त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. यासाठी कामगार संघटना असतात. मात्र, अनेकदा या संघटनांकडून देखील भ्रमनिरास होतो. त्यामुळेच चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील 130 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शिवसेना प्रणित महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक कंत्राटी कर्मचारी सेनेत सामील होण्याचा निर्णय घेतला. अशी माहिती महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक कंत्राटी कर्मचारी सेनेच्या वतीने देण्यात आली आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

मागण्या मान्य होत नसल्याने प्रवेशाचा निर्णय

महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक कंत्राटी कर्मचारी सेनेत प्रवेश करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून आम्ही कंत्राटी कामगार म्हणून काम करत आहोत. अशावेळी अनेकदा अडचणीचे प्रसंग येतात. यावेळी आम्ही कामगार संघटनांकडे धाव घेत होतो. मात्र आम्हाला केवळ आश्वासने दिली जायची. आता आम्ही महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक कंत्राटी कर्मचारी सेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे या संघटनेकडून आम्हाला न्याय मिळेल अशी अशा वाटते, असं या कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाप्रमुख बंडू हजारे, जिल्हा कार्ययाध्यक्ष कैलाश तेलतुंबडे, जिल्हा सचिव अमोल मेश्राम, शहर उपाध्यक्ष महेंद्र ठाकूर यांची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details