चंद्रपूर -अपघात झाला की तो टाळण्यासाठी सर्वांगाने विचार न करता थेट गतिरोधक ( Speed Breaker In Chandrapur) तयार केले जातात. मात्र त्यालाही काही सीमा असणे आवश्यक आहे. पण जटपुरा गेट ते रामनगर या अवघ्या एक किलोमीटरच्या रस्त्यावर तब्बल 12 गतिरोधक ( 12 Speed Breaker Erected On Chandrapur Road ) उभारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यासाठी कुठलीही मंजुरी घेण्यात आलेली नाही. या रस्त्यावर दिवसा अतिक्रमण केले जाते. मात्र याचा बंदोबस्त करण्याऐवजी गतिरोधक ( 12 Speed Breaker Erected On One Kilometer Road ) उभारल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गतिरोधक हे अपघात टाळण्याचा उपाय नाहीगतिरोधक हे अपघात टाळण्याचा हमखास उपाय नाही. म्हणूनच ते उभारण्यासाठी अनेक बाबींचा विचार केला जातो. कारण चुकीच्या पद्धतीने ते बांधल्यास उलट अपघात होण्याचीच शक्यता अधिक असते. रस्ते सुरक्षा समितीकडून गतिरोधक टाकण्यास परवानगी घ्यावी लागते. मात्र लोकप्रतिनिधी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असे गतिरोधक उभारण्यास दबाव आणतात आणि प्रशासनाचे अधिकारी देखील या दबावाला बळी पडत हे काम करतात. मात्र त्याच्या कुठल्याही निकषांचे पालन केले जात नाही. याच पद्धतीने चंद्रपूर नागपूर ( Speed Breaker ) महामार्गावर काही वर्षांपूर्वी गतिरोधक तयार करण्यात आले होते. यामुळे दुचाकी उसळून एका प्राध्यापकाचा मृत्यू झाला होता. मात्र तरीही हे थांबले नाही. रवी आसवानी हे चंद्रपूर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती असताना आपल्या अधिकारांचा वापर करत त्यांनी आपल्या वॉर्डातील एका रस्त्यावर तब्बल 8 गतिरोधक तयार करायला लावले. तसेच आपल्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्यांनी हे दुभाजक तयार केले. अवघ्या शंभर ते दीडशे मीटर अंतरावर हे आठ गतिरोधक लावण्यात आले. त्यातच आता याच मार्गाने पुढे जाणाऱ्या जटपुरा गेटजवळ आणखी चार गतिरोधक तयार करण्यात आले.