चंद्रपूर -जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 1 हजार 170 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, 1 हजार 92 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनामुळे मंगळवारी 22 जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 65 हजार 38 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 47 हजार 217 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या 16 हजार 823 कोरोनाचे सक्रिय रुग्ण असून, आतापर्यंत कोरोनाचे निदान करण्यासाठी 3 लाख 91 हजार 838 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
आज कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील गजानन महाराज चौक परिसरातील 48 वर्षीय पुरुष, पठाणपुरा परिसरातील 50 वर्षीय पुरुष, गांधी चौक येथील 85 वर्षीय महिला, विठ्ठल मंदिर वार्ड परिसरातील 72 वर्षीय पुरुष, 47, 50 व 62 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष वरोरा तालुक्यातील अभ्यंकर वार्ड परिसरातील 55 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील गुरु नगर येथील 54 वर्षीय महिला, कोरपना तालुक्यातील 66 वर्षीय पुरुष, गोंडपिपरी तालुक्यातील सोमनपल्ली येथील 42 वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील तळोधी येथील 35 वर्षीय पुरुष, धामणगाव येथील 65 वर्षीय महिला, ब्रह्मपुरी तालुक्यातील नवरगाव येथील 37 वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील 43 वर्षीय पुरुष, चिमूर तालुक्यातील कोलारी येथील 50 वर्षीय महिला, पाचगाव येथील 55 वर्षीय महिला, वडाला पैकु येथील 53 वर्षीय पुरुष, तर राजुरा तालुक्यातील रामपूर येथील 77 वर्षीय पुरुष तर वणी-नायगाव येथील 26 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 998 जणांचा मृत्यू