महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपूर : 1,135 नवे कोरोना पॉझिटिव्ह; सात रुग्णांचा मृत्यू, एकूण रुग्णसंख्या 8,948 वर - चंद्रपूर कोरोना रुग्णसंख्या

चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 392 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1135 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून सात बाधितांचा मृत्यू झाला आहे.

corona positive
corona positive

By

Published : Apr 16, 2021, 10:07 PM IST

चंद्रपूर -जिल्ह्यात मागील 24 तासात 392 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1135 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून सात बाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 39 हजार 54 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 29 हजार 554 झाली आहे. सध्या 8948 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 20 हजार 367 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 74 हजार 986 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये घुग्गुस येथील 66 वर्षीय पुरुष, राजोली मुल येथील 53 वर्षीय पुरुष, विकास नगर वरोरा येथील 86 वर्षीय पुरुष, दडमल वार्ड चंद्रपूर येथील 59 वर्षीय पुरुष, नगीना बाग चंद्रपुर येथील 43 वर्षीय महिला, गजानन महाराज चौक चंद्रपूर येथील 47 वर्षीय पुरुष, न्यू पटोले नगर येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 552 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 505, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 21, यवतमाळ 20, भंडारा एक, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधित आलेल्या 1,135 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 463, चंद्रपूर तालुका 58, बल्लारपूर 81, भद्रावती 107, ब्रम्हपुरी 118, नागभिड 37, सिंदेवाही सात, मूल 26, सावली चार, पोंभूर्णा तीन, गोंडपिपरी सहा, राजूरा 25, चिमूर चार, वरोरा 155, कोरपना 15, जीवती 11 व इतर ठिकाणच्या 15 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details