चंद्रपूर - शहरातील महाकाली मंदिर परिसरातून ११ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचे विशेष पथक मुलीचा शोध घेत आहे.
चंद्रपुरातील महाकाली मंदिरातून ११ वर्षीय मुलगी बेपत्ता, विशेष पथकाद्वारे शोध सुरू मुळचे नागपूरचे असलेले बळवंत मडावी कुटुंबासह महाकाली मंदिर परिसरात वास्तव्यास आहे. याच परिसरातून त्यांची मुलगी बेपत्ता झाली. लहान मुलींना पळवून नेण्याऱ्या रॅकेटचा नुकताच पोलिसांनी पर्दाफाश केला होता. त्यातच आता ही घटना समोर आल्याने शहरातील पालकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
हेही वाचा -व्होडाफोन आयडियाला 'सर्वोच्च' झटका; थकित शुल्कातील २,५०० कोटी रुपये स्वीकारण्यास नकार
१० वर्षांपूर्वी बंगाली कॅम्प परिसरातून ११ वर्षीय मुलीला गुंगीचे औषध देऊन पळवून नेण्यात आले होते. दशकाच्या संघर्षानंतर ही मुलगी कशीबशी चंद्रपुरात परतली. शहरात मुली पळवून नेणारे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती पीडितेने दिली होती. या माहितीच्या आधारे चंद्रपूर पोलिसांनी हरियाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा राज्यातून मुलींची विक्री करणारे रॅकेट शोधून काढले आहे.